Vidhan Sabha 2019 : विजयानंतर शिवसेनेला विसरू नका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मौदा : शिवसेनेचे कार्यकर्ते युती धर्म निभवणार आहेत. मात्र, भाजप उमेदवाराने दिलेला शब्द पाळला पाहिजे; तरच मदत करू, असे शिवसेनेने ठरविल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी शिवसेनेकडून काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन भाजपच्या उमेदवाराने दिले आहे.शुक्रवारी मौदा येथे गोडबोले यांच्या निवासस्थानावर महायुतीच्या सभेत शिवसेनेच्या वतीने काही अटी टाकण्यात आल्या. कामठी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी शिवसेना प्रचार करेल; पण त्यापूर्वी शिवसनेनेच्या अटी मान्य कराव्यात, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला.

मौदा : शिवसेनेचे कार्यकर्ते युती धर्म निभवणार आहेत. मात्र, भाजप उमेदवाराने दिलेला शब्द पाळला पाहिजे; तरच मदत करू, असे शिवसेनेने ठरविल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी शिवसेनेकडून काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन भाजपच्या उमेदवाराने दिले आहे.शुक्रवारी मौदा येथे गोडबोले यांच्या निवासस्थानावर महायुतीच्या सभेत शिवसेनेच्या वतीने काही अटी टाकण्यात आल्या. कामठी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी शिवसेना प्रचार करेल; पण त्यापूर्वी शिवसनेनेच्या अटी मान्य कराव्यात, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक समितीमध्ये स्थान द्यावे व प्रमुख निर्णयात सहभागी करावे अशी मागणी करण्यात आली.यापूर्वीचा अनुभव चांगला नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी असल्याचे भाजपच्या उमेदवाराला सांगण्यात आले. येणाऱ्या काळात शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येईल व सर्व निर्णयामध्ये शिवसेनेला सहभागी केले जाईल, समितीमध्ये पदे दिली जातील, असा शब्द महायुतीच्या उमेदवाराने दिला. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत एकमेकांना मदत करण्याचे ठरले. बैठकीत शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी मौदा येथील धनजोडे सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप फक्त निवडणुकीपुरतीच शिवसेनेला हाती घेते, नंतर विसरून जाते, असे स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. यामुळे मागील अनुभवामुळे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना समजाविण्याची भूमिका युतीमधील नेत्यांनी बैठकीत घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या विजयासाठी प्रचार केला होता याचाही उल्लेख केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't forget the Shiv Sena after the victory