धावत्या एसटीचा दरवाजा निखळून पडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

टेकाडी ः राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळून पडल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने बस गच्चून भरली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

टेकाडी ः राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळून पडल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने बस गच्चून भरली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
बुधवारी(ता.25) संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास रामटेक डेपोमधून राज्य परिवहन महामंडळाची लालपरी नागपूरसाठी रवाना झाली. दरम्यान, बसमध्ये परतीच्या प्रवासात पाहिजे तेवढी गर्दी नव्हती. रामटेकमधून निघताना बस राष्ट्रीय महामार्गावर डुमरी अण्णामोड येथे पोचली. अचानक बसचा दरवाजा निखळून खाली पडला आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बस ताबडतोब थांबवून दार परत बसमध्ये लावण्यात आले तरी प्रवाशांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण होते. घटनेमुळे एसटी बसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा भंगार अवस्थेत गेलेल्या अनेक बसेसमधून राज्यातील अनेक ठिकाणी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या बसेस वेळीच भंगारात न गेल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
घटनेच्या वेळेत नागपूरवरून रामटेककडे जाणाऱ्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार, महाविद्यालयीन विद्यार्थी सोबत शालेय विद्यार्थ्यांची भाऊगर्दी असते. जिथे पाय ठेवायलादेखील प्रवाशांना जागा नसते. अशात अपघात बस गच्च भरून असलेल्या वेळेला झाला नसल्याने विद्यार्थी वर्गाच्या पालकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The door to the running ST collapsed