
अविनाश साबापुरे
यवतमाळ : लब्ध प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील ‘वैष्णवी’चा हुंड्यासाठी बळी गेला. या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र संतप्त झाला आहे. मात्र हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात येऊन ६५ वर्षे लोटली, तरी हुंडा मागणारा-देणारा अजूनही समाजाला ‘गुंड’ का वाटत नाही, ही खरी शोकांतिका ठरत आहे. लग्नानंतर काही महिन्यांत मुलीचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला हा कायदा का आठवतो?