VIDEO : भाजपचे माजी मंत्री पोलिसांना म्हणाले 'तुम्ही सरकारचे कुत्रे'; पाहा, पोलिसांनी काय दिले उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr anil bonde and police dispute over mpsc exam in amravati

आम्ही परीक्षा मागे घेण्यासाठी  महाराष्ट्र सरकारकडे मागणी करत आहोत. तुम्ही विद्यार्थ्यांना का डांबले? असा प्रश्न डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यासोबत वाद झाला.

VIDEO : भाजपचे माजी मंत्री पोलिसांना म्हणाले 'तुम्ही सरकारचे कुत्रे'; पाहा, पोलिसांनी काय दिले उत्तर

अमरावती : एमपीएससीने गुरुवारी परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अमरावती शहरात देखील विद्यार्थ्यांनी चक्काजाम केला. आंदोलन मागे घेण्याबद्दल पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना म्हटले असता वाद निर्माण झाला. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचे निवेदन घेण्यासाठी यावे व आमच्या भावना समजून घेऊन सरकारला कळवाव्यात, अशी भूमिका परीक्षार्थ्यांनी घेतली. दरम्यान, माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे तेथे पोहोचले. त्यांचाही पोलिसांसोबत वाद झाला. यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी 'तुम्ही सरकारचे कुत्रे आहात', असे पोलिसांना म्हटले. त्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा - मेडिकल-सुपर-मेयोला भिकेचे डोहाळे, केवळ१० टक्के खर्च करण्याची अट पडतेय महाग

आम्ही परीक्षा मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागणी करत आहोत. तुम्ही विद्यार्थ्यांना का डांबले? असा प्रश्न डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यासोबत वाद झाला. यावेळी डॉ. बोंडे यांनी 'तुम्ही सरकारचे कुत्रे आहात', अशा शब्दात पोलिसांना सुनावले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने देखील असे अपशब्द वापरू नका, असे म्हणत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परत अनिल बोंडे यांनी 'होय तुम्ही सरकारचे कुत्रे आहात', असा पुनरुच्चार केला. त्यानंतर संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी देखील 'तुम्हीही कुत्रे आहात' असे अनिल बोंडे यांना म्हटले. याबाबतचा व्हिडिओ खुद्द डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच 'चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आत मध्ये टाकलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस निरीक्षक चोरमाले यांना तत्काळ निलंबित करा व 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्यसरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे. भाजपा विद्यार्थ्यांसोबत आहे', असे या ट्विटमध्ये डॉ. बोंडे म्हणाले. 

संपादन - भाग्यश्री राऊत

loading image
go to top