
अमरावती : न्यायमूर्ती भूषण गवई येत्या १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होत आहेत. त्यांना घडवण्यात त्यांच्या आई डॉ. कमलताई गवई यांचे योगदान मोठे आहे. परिस्थितीशी दोन हात करीत कुटुंबाचा डोलारा पेलण्यासोबतच तीनही मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन करून त्यांना विविध क्षेत्रांत उंच भरारी घेण्यास बळ देणाऱ्या डॉ. कमलताईंच्या जीवनाची कथा निराळीच आहे. विशेष म्हणजे आजही त्यांच्यात तीच ऊर्जा कायम असून अनेकांना त्यांनी आधार दिला आहे.