डॉ. मदन कुळकर्णी म्हणाले, विठ्ठलाची साधना संगीत साधनेशी जुळते 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्‍ताबाई यांनी प्रखर ज्ञानचेतनेने "विठ्ठल' साधनेचा वारसा जनसामान्यांत पोहोचवला. तशीच संगीत साधना मंगेशकर कुटुंबाने केली आहे. लतादीदी, आशा, उषा अन्‌ हृदयनाथ मंगेशकर कुटुंबाने संगीत साधनेचा वसा पुढे चालवला आहे. काळ वेगळा असला तरी दोघांच्याही कार्यात साधनेचे साम्य जाणवते. म्हणूनच विठ्ठल साधना नेहमीच संगीताशी जुळत असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुळकर्णी यांनी व्यक्‍त केले. 

साहित्य विहार संस्थेतर्फे डॉ. मदन कुळकर्णी यांना डॉ. भा. श्री. फडनाईक यांच्या हस्ते ज्ञानयोगी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुळकर्णी यांना ज्ञानयोगी पुरस्कार देणे आमच्या भाग्यात होते. घटस्थापनेच्या दिनी हा मंगलयोग साधून आला. त्यांचे कार्य फलदायी ठरले आहे, असे डॉ. भा. श्री. फडनाईक म्हणाले. पंकज चांदे यांनी आशा पांडे यांच्या कार्याचे कौतुक केले. सामान्य माणूस साधारणतः लिहायला धजावत नाही. साहित्याचे कौतुक होईल की, नाही? अशी त्याला धास्ती असते. त्याला पाठीवर कौतुकाची थाप हवी असते. ते काम साहित्य विहार संस्था करते आहे, असे म्हणत चांदे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Madan Kulkarni said, Vitthal's sadhana is similar to the musical instrument