Gadchiroli News : गडचिरोली येथे २८ नोव्हेंबरला होणाऱ्या पाचव्या नवोदित आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे प्राध्यापक डॉ. सखाराम डाखोरे यांची निवड

Dr Sakharam Dakhore Elected President of Navodit Adivasi Literary Conference : गडचिरोली येथे २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या नवोदित आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईतील प्राध्यापक डॉ. सखाराम डाखोरे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Dr Sakharam Dakhore Elected President of Navodit Adivasi Literary Conference

Dr Sakharam Dakhore Elected President of Navodit Adivasi Literary Conference

esakal

Updated on: 

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली तसेच क्रांतीवीर नारायणसिंग उईके विकास समिती ब्रह्मपुरी यांच्यातर्फे लोकनेते आदिवासीरत्न बाबुरावजी मडावी जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली येथील सामाजिक न्याय भवन, समाज कल्य़ाण कार्यालयात 'नवोदीत आदिवासी साहित्य संमेलन' (पाचवे) पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सखाराम डाखोरे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

Loading content, please wait...