esakal | ड्रॅगन पॅलेसच्या ओगावा अत्यवस्थ
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रॅगन पॅलेसच्या ओगावा अत्यवस्थ

ड्रॅगन पॅलेसच्या ओगावा अत्यवस्थ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : जपान व भारतातील शांती आणि मैत्रीचे प्रतीक असलेल्या विश्‍वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारणीसाठी महादान देणाऱ्या जपानच्या "नोरिको ओगावा' यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या प्रकृतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली असून ऍड. सुलेखाताई कुंभारे जपानला रवाना झाल्या आहेत. नागपूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर 1999 मध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारले. या पॅलेसच्या उद्‌घाटनप्रसंगी ओगावा यांनी कामठीला भेट दिली. यानंतर 2000 सालच्या पहिल्या वर्धापन दिनाला त्यांनी ड्रॅगन पॅलेसमध्ये हजेरी लावली. मात्र यानंतर आजारपणामुळे त्यांची दृष्टी गेली. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ओगावा यांनी अंतिम समयी ऍड. कुंभारे त्यांच्यासोबत असाव्यात ही इच्छा व्यक्त केली. ओगावा यांच्या परिवाराने ही वार्ता पोहोचवताच ऍड. कुंभारे या तातडीने आज जपानला रवाना झाल्या आहेत.
loading image
go to top