esakal | नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल

बोलून बातमी शोधा

नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल
नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाच्या संसर्गामुळे दारू दुकाने बंद असल्याने दुप्पट-तिप्पट किंमतीत देशी, विदेशी आणि गावठी दारूची विक्री केली जात आहे. जादा पैसे मोजूनही अनेक शौकीन मद्य पीत आहेत. तर, दारू न मिळाल्यास चक्क सॅनिटायझरची नका करण्यापर्यंत मद्यपींनी उंची गाठली आहे. वणीत सात जणांना असाच आपला जीव गमवावा लागल्याने नशेच्या धोकादायक पर्यायाची पोलखोल झाली.

हेही वाचा: कोरोनाकाळात काय आहेत सोशल मीडिया ट्रेंड सर्च ; जाणून घ्या

दारूच्या आहारी गेलेल्यांना पोटात गेल्याशिवाय करमत नाही. मद्यपी कामधंदे सोडून दारू कुठे मिळते, याचा शोध घेत राहतात. विदेशी नाही मिळाली तर, देशी आणि देशी नाही मिळाली तर गावठी, काहीही चालते. त्यासाठी ग्रामीण भागात शोध घेतला जातो. सॅनिटायझरमध्ये अल्कहोलचे प्रमाण असते.

हीच गोष्ट हेरून गेल्या वर्षीही कित्येकांनी सॅनिटायझरद्वारे झिंग पूर्ण केली. यंदा तर वणीतील घटनेने चांगलीच खळबळ उडवून दिली. नशा करण्यासाठी विविध प्रकारच्या साधनाचा वापर केला जात असल्याची बाब लपून नाही. त्यात आता सॅनिटायझरची भर पडली आहे. हा पर्याय धोकादायक ठरत असल्याचे दिसते. सॅनिटायझर दारू नव्हे, या बाबत जनजागृती करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: उपराजधानीत वाढले वकिलांच्या मृत्यूचे प्रमाण; कोरोनाने महिन्याभरात १५ मृत्यू

व्हीसेरासोबत नमून्याची तपासणी

सात जणांपैकी एकाचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला. तिघांच्या मृत्यूची आकस्मिक नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. इतर तिघे रुग्णालयात गेले. डॉक्‍टरांनी त्यांना रेफर केले. मात्र, ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर आपल्याला कोरोनात टाकतील, या भीतीने उपचार न घेता निघून आले. पोलिसांनी सॅनिटायझरचे नमूने तपासणीसाठी घेतले असून, व्हीसेरासोबत पाठविण्यात येणार आहे. सॅनिटायझरचा मृतांच्या शरीरावर कोणता परिणाम झाला, याची माहिती तज्ज्ञांकउून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ