esakal | गोंडखैरीत ट्रकचालकास दगडाने ठेचले
sakal

बोलून बातमी शोधा

सतनामसिंग कुंदनसिंग सोइये

गोंडखैरीत ट्रकचालकास दगडाने ठेचले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणा (जि.नागपूर) : गोंडखैरी येथे ढाब्यावर जेवणाच्या वादातून हटकल्याने कुरिअरच्या ट्रकचालकास आठ ते दहा तरुणांनी लाताबुक्‍या व दगडाने डोक्‍यावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशीष पेट्रोलपंपानजीकच्या जंगा ढाबा परिसरात 29 आगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतनामसिंग कुंदनसिंग सोइये (40, यशोधरानगर पोलिस स्टेशनजवळ, नागपूर) हे गोंडखैरी येथील आशीष पेट्रोलपंपनजीकच्या एका कुरिअर कंपनीमध्ये ट्रकचालक म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून काम करतात. 29 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास कार्यालयाच्या बाजूने असलेल्या जंगा ढाब्यावर जेवण करायला गेले. दरम्यान, आठ ते दहा तरुण तिथे जेवण करायला आले. ते एका वेटरला शिवीगाळ करू लागले व मारू लागले. सोईये बाजूने जेवण करीत असताना आमच्याकडे का बघितले म्हणून फिर्यादी सतनामसिंगला शिवीगाळ करून लाताबुक्‍यांनी व दगडाने मारू लागले. दरम्यान, कुरिअर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी बचावाकरिता सतनामसिंगला लपवून ठेवले. घटनेची तक्रार 100 क्रमांकावर केल्यानंतर अर्ध्या तासात कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यादरम्यान डोक्‍याला गंभीर दुखापत असल्याने रक्तबंबाळ अवस्थेत जखमी सतनामसिंगला ताबडतोब कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पोलिसांनी दाखल केले. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (जि.नागपूर) सतनामसिंग कुंदनसिंग सोइये

loading image
go to top