चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त वर्धा, वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा समावेश आहे. मृतांत प्रतिमा प्रकाश मंडल (वय-२३), कविता प्रकाश मंडल (वय-२१), लिपिका प्रकाश मंडल (वय-१८) यांचा समावेश आहे. दुसऱ्या एका घटनेत तुषार शालीक आत्राम (वय-१७), मंगेश बंडू चनकापुरे (वय-२०), अनिकेत शंकर कोडापे (वय-१८) यांचा मृत्यू झाला. वृत्तलिहेपर्यंत कविता मंडल आणि मंगेश चनकापुरे यांचे मृतदेह मिळाले. उर्वरित जणांचा शोध पथकांच्या माध्यमातून सुरू आहे.