
गोंदिया : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीतील कामठा येथे रविवारी (ता. २५) मोठी कारवाई करत ६०० ग्रॅम गांजासह रोख २० लाख रुपये जप्त केले आहे. पोलिसांची चाहुल आरोपीला लागताच तो पळून जाण्यात यशस्वी झाला. उमेश ऊर्फ करण हरिचंद अग्रवाल (वय २५, रा. कामठा) असे फरार आरोपीचे नाव आहे.