सिमेंट रस्ते बांधकामामुळे वाहतूक कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरात तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ता बांधकामाला सुरुवात झाली असून अनेक मार्गावर कामे सुरू असल्याने नागपूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यात आता आणखी दहा मार्गांची भर पडली असून डिसेंबरपर्यंत विविध रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहे.

नागपूर : शहरात तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ता बांधकामाला सुरुवात झाली असून अनेक मार्गावर कामे सुरू असल्याने नागपूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यात आता आणखी दहा मार्गांची भर पडली असून डिसेंबरपर्यंत विविध रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहे.
शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतेच दिले. त्यानुसार उत्तर अंबाझरी मार्गावरील अजित बेकरीसमोर सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे एक स्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रोडपर्यंतचा उजव्या बाजूचा रस्ता 14 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा मार्गावरील उजव्या बाजूचे काम सुरू होणार असल्याने हा रस्ता 18 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या रस्त्यावर तुकडोजी पुतळा चौकात डाव्या बाजूने बस थांबा असल्याने तेथे बस थांबते. याशिवाय ऑटो चालकांचीही गर्दी असते. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. आझाद चौक ते आयचित मंदिर व दक्षिण नागपूर व मध्य नागपूर जोडणारा प्रमुख रस्ता असलेले झेंडा चौक ते सक्करदरा चौक व्हाया जुनी शुक्रवारी दरम्यानची वाहतूकही बंद करण्यात आली. याशिवाय गजानन चौक ते सक्करदरा चौक दरम्यानची डाव्या बाजूची वाहतूक 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आली. त्यामुळे सक्‍करदरा भागात वाहतुकीची मोठी समस्या उभी राहणार आहे. उत्तर नागपुरातील नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक दरम्यानची वाहतूक 10 ऑक्‍टोबरपर्यंत बंद करण्यात आली. टेका नाका चौक ते नारी गावपर्यंत मार्गावरील वाहतूक 10 ऑक्‍टोबरपर्यंत बंद राहील. बापुना वाईन शॉप ते गुरुनानक सोसायटीपर्यंतची दोन्ही बाजूची वाहतूक 10 ऑक्‍टोबर 2019 पर्यंत बंद करण्यात आली. संपूर्ण रस्ताच बंद केल्याने या भागातील वाहनधारकांना आता इतर मार्गाचा वापर करावा लागणार आहे. कुकरेजानगर ते कस्तुरबानगर गल्ली नं. 1, 2, 3, 4 या मार्गावरील वाहतूक 10 ऑक्‍टोबरपर्यंत बंद राहील. या मार्गांवरील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात येणार असल्याने वस्त्यांमध्ये वाहनांची वर्दळ वाढणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the construction of the cement roads, traffic problem is increasing