पीएसआय मुळेंच्या मृत्यूची चौकशी एसीपींकडे; ऑडिओ क्लीप व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएसआय मुळेंच्या मृत्यूची चौकशी एसीपींकडे; ऑडिओ क्लीप व्हायरल

पीएसआय मुळेंच्या मृत्यूची चौकशी एसीपींकडे; ऑडिओ क्लीप व्हायरल

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्याप्रकरणाची (मृत्यूची) चौकशी सहायक पोलिस आयुक्त गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी मुळे यांनी रहाटगाव रिंगरोडवरील एका झाडावर गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची एकासोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल झाली. त्या व्हायरल क्लीपप्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश दिलेले नाही. सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात, असे सीपींनी सांगितले.

फक्त उपनिरीक्षक मुळे यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली? यासंदर्भातील शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये नोकरीच्या काळात काही प्रकरणात मनस्ताप झाल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात याप्रकरणाची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली. पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली आहे. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील काही जणांचे बयाणही नोंदविले आहे.

टॅग्स :Anil Mule