Buldhana : स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले चार रोहित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले चार रोहित्र

स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले चार रोहित्र

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील कृषी पंपाचे जळालेले रोहित्र दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने बुधवारी (ता.१७) आंदोलन केले. त्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेले रोहित्र बदलण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद पडलेले रोहित्र दुरुस्ती करा, तातडीने सुरु करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह संग्रामपूर महावितरण सहाय्यक अभियंता एस. बी. नवलकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मुख्य अभियंता डोये (अकोला), अधिक्षक अभियंता एस. एम. आकडे (बुलडाणा), कार्यकारी अभियंता अभिजित जिवनसिंग दिनोरे (खामगाव) यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. तातडीने नवीन रोहित्र बसवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आले.

महावितरणने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करीत रविवारी (ता.२१) तालुक्यातील सावळा शिवारातील वानखडे नामक रोहित्र, निरोड शिवारातील जाधव नामक रोहित्र, देऊळगाव शिवारातील म्हसाळ रोहित्र, अकोली शिवारातील श्रीधर रोहित्र नव्याने बसवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांनी डिक्कर यांच्यासह सहायक अभियंता नवलकर यांचे आभार मानले. या वेळी काँग्रेस नेते राजू देशमुख, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, श्‍याम ठाकरे, विठ्ठल वखारे, अनुप देशमुख, विठ्ठल ताथोड, नयन इंगळे, सुपडा सोनोने, वैभव मुरुख, मंगेश भटकर, गजानन रावणकार, विशाल चोपडे, विशाल सांवत, गणेश वहितकार, शुभम वखारे, दिलीप वानखडे, रोशन देशमुख उपस्थित होते.

loading image
go to top