बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’

बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सावंगा येथील रहिवासी किशोर सुखदेव खानजोडे (Kishor Khanjode) हा दहावी नापास आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक तरुणाई बेरोजगार झाली. अनेकांच्या व्यवसायाला टाळे लागले. मात्र, दहावी नापास असलेला किशोर शेकडो बेरोजगारांसाठी देव झाला आहे. त्याने अनेक बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मखमली वाट तयार केली. ही किमया त्याने व्यवसायाने साधली आहे. त्याच्या स्वरा डायमंडमुळे कित्येकांना रोजगार मिळाला (Diamond provided employment) आहे. (Due-to-Swara-Diamond-many-people-got-employment-in Ner-taluka)

किशोरचा जन्म नेर तालुक्‍यातील सावंगा या छोट्याशा गावात झाला. घरात अठराविश्वे दारिद्य्र, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार. रोजगाराच्या शोधात मोठा भाऊ सुरत येथे गेला. किशोरचे शिक्षण कसेबसे सुरू होते. कधी शेतात राबायचे तर कधी इतरांच्या मजुरीला जायचे. आलेल्या मजुरीच्या पैशात कसेबसे पोटात दोन घास ढकलायचे असा जीवनक्रम सुरू होता. सावंगा ते नेर शाळेसाठी पायदळी वाट तुडवत यायची. कधी कुणाच्या सायकलीवर तर कधी पायदळी शिक्षण कसेबसे घेणे सुरू होते. अशात किशोर दहावी नापास झाला आणि शैक्षणिक प्रवास थांबला.

बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’
नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

जीवनात पुढे काय असा प्रश्‍न त्याच्यासमोर निर्माण झाला. गावाकडे राहिलो तर इतर सवंगड्यात सारखेच काबाडकष्ट करून जीवन जगावे लागले. या विचाराने त्याला घेरले. काही तरी वेगळे करण्याची खूणगाठ बांधून १९९३ मध्ये किशोर सुरतला गेला. तिथे त्याने दोन ते तीन वर्ष हिऱ्यावर पैलू पाडण्याचे काम केले. यानंतर पाच ते सहा वर्ष जनरल मॅनेजर म्हणून काम केले. तब्बल पंधरा वर्ष मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केले. मात्र, किशोर स्वस्थ बसला नाही. तर त्याने सुरत येथे आपला स्वतःचा हिऱ्यावर पैलू पाडण्याचा कारखाना सुरू केला. कारखाना सुरू होऊन जेमतेम बारा महिने लोटले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना कोरोनाने डंख मारला.

सर्व उद्योग लॉकडाउनमुळे बंद पडले. किशोरही नाइलाजाने गावाकडे आला. दोन ते तीन महिने लॉकडाउनमध्ये गेले. या काळात कमालीचा अस्वस्थ झाला. त्याच्यातील कर्तृत्ववान पिंड स्वस्थ बसू देत नव्हता. नेर तालुक्‍यातील पाच हजारांच्या जवळपास बेरोजगार युवक सुरत येथे हिऱ्यावर पैलू पाडण्यासाठी जातात. हेच सर्वच्या सर्व लोक खेड्यात या संकटकाळी परत आले. खेड्याकडे परत आलेल्या कुशल कामगारांना गावातच रोजगार दिला तर, असा विचार त्याच्या मनामध्ये घोंगावू लागला.

बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’
निंदनीय! पतीने परवानगी दिल्याने दिराने केला वहिनीवर बलात्कार

किशोरने या संकटाची संधी करण्याचे ठरवले. लगेच दुसऱ्या दिवशी आपला भाऊ प्रमोद खानजोडे याच्या कानावर हा विषय टाकला. तसेच जागेबद्दल विचारणा केली. प्रमोदने लगेच नेरचे उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल यांच्याकडे नेले. त्यांच्या मालकीची जागा उद्योगासाठी मिळवून दिली. उर्वरित मदत उमेश इंगोले या सामाजिक कार्यकर्त्याने केली. जुलै महिन्यात स्वरा डायमंड हिऱ्यावर पैलू पाडण्याचा उद्योग शहरात नव्या दमात व जोमात सुरू झाला. सुरतवरून परत आलेल्या कुशल कामगारांना गावातच रोजगाराची मोठी संधी स्वरा डायमंडच्या माध्यमातून चालून आली. सध्या किशोरकडे १२ जण पगारदार मॅनेजर आहेत. तर ५६ जण हिऱ्यावर पैलू पाडण्याचे काम करत आहेत.

रोजगारात केवळ ५० रुपयांची तफावत

एका घंटीवर चार जण पैलू पाडण्याचे काम करतात. यातून प्रत्येकी पाचशे ते हजार रुपयापर्यंत दररोजची मिळकत आहे. सुरत येथे मिळणारा रोजगार व नेर येथे मिळणाऱ्या रोजगारात केवळ ५० रुपयांची तफावत आहे. सुरत सारख्या महागड्या शहरात राहून खर्चीक जिने जगण्यापेक्षा खेड्यात आप्तस्वकीयांत राहून काम करण्यास अधिक आनंद आहे, असे येथील कामगार बोलतात.

बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी देणारा किशोर ‘हिरा’
असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या

किशोर खरा ‘युथ आयकॉन’

पूर्वी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत काम केले जात होते. कोरोनाचा नव्याने प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या नऊ ते पाच या कालावधीत काम सुरू आहे. बेरोजगारीच्या वाळवंटात रोजगाराची संधी उपलब्ध करणारा किशोर खरा ‘युथ आयकॉन’ ठरला आहे. ग्रामीण भागात किशोरने सुरू केलेल्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाहेरागावी जाऊन मजुरी करणाऱ्या युवकांनी गावातच रोजगार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

(Due-to-Swara-Diamond-many-people-got-employment-in Ner-taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com