esakal | इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचा दरवाजा बंद, महोत्सव सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

नवरात्र महोत्सव सुरू झाला असला तरी महोत्सव सुरू करण्यास शासनाची परवानगी नाही. कोरोनाची भीती असल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद आहेत. भाविकांचे येणे-जाणेही बंद अाहे आणि इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचे दरवाजे बंद आहे.

इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचा दरवाजा बंद, महोत्सव सुरू

sakal_logo
By
शशांक देशपांडे

दर्यापूर : नवरात्र महोत्सव सुरू झाला असला तरी महोत्सव सुरू करण्यास शासनाची परवानगी नाही. कोरोनाची भीती असल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद आहेत. भाविकांचे येणे-जाणेही बंद अाहे आणि इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचे दरवाजे बंद आहे. मात्र, आतमध्ये मंदिरापुरता महोत्सव सुरू झाला आहे.

दर्यापूर तालुक्‍यात अती पुरातन मंदिर असलेले आशा-मनीषा मंदिर तसेच गणेशपूर-मूर्तिजापूर रोड याठिकाणी स्थापन केलेले इच्छापूर्ती नवदुर्गा मंदिर आहे. याठिकाणी हजारो भाविकांची रेलचेल दरवर्षी दिसत होती. मात्र यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाने बंद दरवाजा ठेवून उत्सव सुरू ठेवला आहे तसेच शेजारीच अखंड ज्योत हा कार्यक्रमसुद्धा नित्याने सुरू असल्याचे आयोजक राजू पनपालिया यांनी सांगितले. त्याठिकाणीसुद्धा भाविक भक्तांना प्रवेश असून जवळजवळ ५०१ अखंड ज्योत उद्यापासून सुरू होणार आहे.

वाचा - अमरावतीवरून येत होते वाळूमाफिये दोन देशी कट्टे घेऊन, मात्र पुलगावात अडकले पोलिसांच्या जाळ्यात

संपूर्ण परिसर हा प्रकाशमय करण्याचा प्रयत्न अखंड ज्योतच्या माध्यमातून श्रद्धा असलेल्या भाविक भक्तांच्या माध्यमाद्वारे होणार आहे. दरवाजे बंद असतानासुद्धा बंद दरवाज्यांच्या दर्शनाचा अनेक भक्तांनी सकाळी पाच वाजेपासूनच लाभ घेतला. मात्र शासनापुढे संस्था हतबल आहे. नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा भाविकभक्तांविनाच उत्सव साजरा करण्याची वेळ आली असल्याची खंत संस्थेचे प्रमुख बालकिसन पनपालिया यांनी व्यक्त केली. संस्थान मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्याचे काम सुरू आहे. यावर्षी मंदिरासमोर सुंदर असे प्रवेशद्वार उभारण्याचे काम सध्या नवरात्र उत्सवामुळे बंद आहे. त्याचबरोबर इच्छापूर्ती नवदुर्गा मंदिर येथे दर मंगळवारी संध्याकाळी मिळणारा प्रसाद तोसुद्धा संस्थेने बंद केला असल्याची माहिती सुभाष शेठ पनपालिया यांनी दिली.

संपादन - नरेश शेळके

loading image
go to top