उपोषणादरम्यान नगराध्यक्षांची प्रकृती खालावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पारशिवनी  (जि.नागपूर) : तालुक्‍यातील न्यायव्यवस्था पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही नसल्याने उपोषणाला बसलेल्या महिला नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, बालकल्याण सभापती अनिता भड यांची प्रकृती खालावत आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

पारशिवनी  (जि.नागपूर) : तालुक्‍यातील न्यायव्यवस्था पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही नसल्याने उपोषणाला बसलेल्या महिला नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, बालकल्याण सभापती अनिता भड यांची प्रकृती खालावत आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.
पारशिवनी हे तालुक्‍याचे ठिकाण असून येथे फौजदारी व दिवाणी प्रकरणे चालवली जात असताना येथील प्रकरणे कामठी न्यायालयात का स्थलांतरित करण्यात आली? ती प्रकरणे परत पारशिवनी न्यायालयाशी संलग्न करण्यात यावी, याकरिता मंगळवारपासून (ता. 3) बाजार चौकात नगराध्यक्ष प्रतिमा कुंभलकर, तसेच बालकल्याण सभापतींसह अनेक नागरिक बेमुदत उपोषणाला बसले. एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीविषयी विचारपूस केली नाही. या उपोषणकाळात येथील महिला या उपाशी असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष निर्माण होत आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आतापर्यंत येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुद्धा या उपोषणाची दखल घेतली नसल्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. पारशिवनी येथील 119 गावांचा असलेला तालुका हा कमकुवत करण्यात येत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांचे बांधकाम करून दोन मजली न्यायालयाची इमारत असून दोन न्यायाधीश नियुक्त केले असताना सुरळीत न्यायदानाचे काम होत आहे. मध्येच पारशिवनी तालुक्‍यातील 23 गावे ही कामठी न्यायालयाशी जोडण्यात आली. नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत असून शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून महिलांसह पुरुष उपोषण करीत आहेत. याची दखल शासनाने घ्यावी याकरिता आज पारशिवनी येथील महिलांनी तहसील कार्यालय गाठून निवेदन दिले. उपोषणाची सांगता झाली नाही तर शहरातील इतरही महिला उपोषणाला बसणार असल्याने प्रकरण वाढत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the fast the city president's nature deteriorated