esakal | COVID19 : धक्कादायक : प्लास्टिक थैली घालून बजावताय कर्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

sultanpur photo.jpg

कर्मचाऱ्याचा तसा फोटो समाज माध्यमावर फिरत असल्याने सध्याच्या लॉकडाउनमध्ये गरजूंना मदत करण्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्याच्या सुरक्षा साधनांसाठी सुद्धा मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होत आहे.

COVID19 : धक्कादायक : प्लास्टिक थैली घालून बजावताय कर्तव्य

sakal_logo
By
सागर पनाड

सुलतानपूर (जि.बुलडाणा) : कोरोना व्हायरस विषाणूंचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य पार पडत आहे. परंतु, त्यांना वेळेवर साहित्य मिळत नसल्यामुळे स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता कोरोनासोबत लढा देण्यासाठी चक्क प्लास्टिक थैली घालून मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची तपासणी आणि नोंदणी करण्याचे काम मेहकर मतदारसंघातील बऱ्याच कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधित 5 रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागासह सह सर्वच संलग्न विभाग मिशन मोडवर आले. यातच मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची कसोशीने चौकशी करून त्यांना 14 दिवसांकरिता घरीच निरीक्षणात ठेवण्यात आले. परंतु, सदर व्यक्तींची चौकशी, तपासणी आणि नोंदणी करताना कोरोना व्हारसच्या विषाणूंपासून नागरिकांचे आरोग्यासाठी झटत असलेल्या कर्मचाऱ्याला स्वरक्षणासाठी शासनाकडून सुरक्षा साधणे पुरविल्या जात नसल्याने चक्क प्लास्टिक थैलीचे हातमोचे घालून कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावाने लागत असल्याचा गंभीर प्रकार सुलतानपूर प्रा. आ. केंद्रात समोर आला आहे. 

आवश्‍यक वाचा - निजामुद्दीनहून परतलेल्यांचा अहवाल बघा काय आला!

कर्मचाऱ्याचा तसा फोटो समाज माध्यमावर फिरत असल्याने सध्याच्या लॉकडाउनमध्ये गरजूंना मदत करण्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्याच्या सुरक्षा साधनांसाठी सुद्धा मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्य महामार्गावर असून, 19 गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येथे जवळपास 20 आरोग्य अधिकारी कर्मचारी असून त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन मात्र निष्काळजी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या मुक्त संचारामुळेही प्रशासनला नाकीनऊ आले आहे. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. 

केंद्रावर 19 गावांची आरोग्याची जबाबदारी असून त्यादृष्टीने वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, आशावकर्स मेहनत घेत आहे. मात्र, तरी होम क्वारंटाईन व्यक्ती विनाकारण बाहेर फिरत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने समिती अध्यक्ष तलाठी प्रमोद दादंडे यांनी समिती सदस्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी जि. प. सदस्यपती दिलीपराव वाघ, प्रा.आ. केंद्राचे सुपरवायझर मनोहर चंद्रशेखर, बी. पी. हिवाळे, सेविका एस. पी. क्षीरसागर, व्ही. एस. कुटे, पोलिस पाटील रेखा भानापुरे, अंगणवाडी सेविका आशा टकले, रेणुका दळवी, पुष्पा मोरे, सत्यशिला टकले, दुर्गा भानापुरे, रेखा जाधव, अंजली परिहार, सुरेखा अंभोरे व आशा वर्क्सस शशिकला मोरे,  शारदा मुळे, आशा पनाड, राधा रिठे, पुष्पा रिंढे, मीना मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, दिलीपराव वाघ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत उपस्थित महिलांना सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. यावेळी राम कडूकर, संघपाल पनाड, मो. मुशाबर उपस्थित होते.

होम क्वारंटाईन व्यक्तींचा मुक्त संचार : प्रशासनाच्या नाकीनऊ
सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअर्तगत गावात 1 मार्चपर्यंत शहरी भागातून आलेल्या 981 व्यक्तींना होम क्वारंटाईन केले असून संदर्भात 4 व्यक्ती असून दोघे बाहेर देशातून आले असल्याची माहिती आहे. परंतु, होम क्वारंटाईन व्यक्तींचा गावभर होत असलेला मुक्तसंचार प्रशासनाची डोकेदुखी वाढत असल्याने येथील प्रा.आ. केंद्रात कोरोना विषाणू नियंत्रण समितीची तातडीची बैठक घेत याबाबत कडक उपाययोजना करण्याचा निर्णय करण्यात आला.

24 तास सेवा देण्याची गरज
31 मार्चला रुग्णाला घेऊन पोलिस कर्मचारी व पदाधिकारी आले असता सुलतानपूर प्रा.आ. केंद्राला कुलूप असल्याने रुग्णाला 1 तास ताटकळत बसावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रा.आ. ंकेंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी किमान कोरोना व्हायरस या जिवघेण्याप्रसंगी तरी 24 तास सेवा द्या अशी लेखी मागणी मराठा प्रतिष्ठानकडून जि.प. सदस्याव्दारे प्रशासनाकडे केली.