हे देवा! पूर्व विदर्भ मलेरियाग्रस्त; गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

केवल जीवनतारे
Thursday, 10 December 2020

नागपूरसह इतरही जिल्ह्यात फार कमी रुग्णांची नोंदी असल्याने तेथे खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नोंदी होत नाही काय, हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. तर, नागपूर विभागातील या रुग्णसंख्येला आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे. 

नागपूर : नागपूरची लोकसंख्या ३० लाखांवर आहे. मात्र, फक्त दोन मलेरियाग्रस्तांची नोंद झाली आहे. मृत्यू झाला नाही, ही विशेष बाब. मात्र, पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत मलेरियाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत मलेरियाचे तीन हजार ३३ रुग्ण आढळले होते. परंतु, २०२० मध्ये याच कालावधीत सहा हजार ३३६ मलेरियाग्रस्त आढळले. मृत्यूमध्येही दुप्पट वाढ झाली. गतवर्षी अवघे सहा मृत्यू झाले होते. यावर्षी १२ जण दगावले आहेत.

पुणेतील आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हिवतापाचे तीन हजार ३३ रुग्ण व ७ मृत्यू होते. सर्वाधिक दोन हजार ५९० रुग्ण व तीन मृत्यू गडचिरोलीतील होते. भंडारात १४ रुग्ण व दोन मृत्यू होते. गोंदियात ३०१ रुग्ण व दोन मृत्यू होते. चंद्रपूरला ९४ रुग्ण व मृत्यूचा आकडा शून्य होता.

अधिक वाचा - २४ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर सापडलेल्या 'वर्षा'चं गृहमंत्री अनिल देशमुख करणार कन्यादान

नागपूरच्या ग्रामीण भागात २३ रुग्ण व शून्य मृत्यू होते. नागपूर महापालिका हद्दीत ५ रुग्ण व शून्य मृत्यू होते. वर्धा जिल्ह्यात ६ रुग्ण व शून्य मृत्यू होते. २०१९ मध्ये या कालावधीत पूर्व विदर्भात दोन हजार ७२८ रुग्ण व ६ मृत्यू होते. सर्वाधिक दोन हजार ४२८ रुग्ण गडचिरोलीतील होते. येथे एकाचा मृत्यू झाला.

भंडारात ७ रुग्ण व शून्य मृत्यू, गोंदियात २२४ रुग्ण व तीन मृत्यू, चंद्रपूरला ५३ रुग्ण व एक मृत्यू, नागपूरच्या ग्रामीण भागात १० रुग्ण व एक मृत्यू, नागपूरच्या महापालिका हद्दीत दोन रुग्ण व शून्य मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ४ रुग्ण व शून्य मृत्यू होते. २०२० मध्ये याच कालावधीत पूर्व विदर्भात ६ हजार ३३६ रुग्ण व १२ मृत्यू झाले. पैकी सर्वाधिक ५ हजार ८०८ रुग्ण व ५ मृत्यू गडचिरोलीत होते.

सविस्तर वाचा - बापरे! घराच्या मागेच लपून होता वाघ, सरपण आणायला जाताच महिलेवर केला हल्ला

भंडारात १४ रुग्ण व २ मृत्यू, गोंदियात ३१९ रुग्ण व २ मृत्यू, चंद्रपूरला १८६ रुग्ण व ३ मृत्यू, नागपूर ग्रामीणला ३ रुग्ण व शून्य मृत्यू, नागपूर महापालिका हद्दीत ६ रुग्ण व शून्य मृत्यू होते. तर, वर्धेत एकही रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे येथील नोंदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागपूरसह इतरही जिल्ह्यात फार कमी रुग्णांची नोंदी असल्याने तेथे खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नोंदी होत नाही काय, हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. तर, नागपूर विभागातील या रुग्णसंख्येला आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे. 

जाणून घ्या - ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून

पूर्व विदर्भातील स्थिती (१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर) 

वर्ष रुग्ण मृत्यू
२०१८ ३,०३३ ०७
२०१९ २,७२८ ०६
२०२० ६,३३६ १२

संपादन - नीलेश डाखोरे

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: East Vidarbha suffers from malaria