esakal | शेतीपूरक लघुउद्योगांद्वारे आर्थिक विकास साधावा
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

शेतीपूरक लघुउद्योगांद्वारे आर्थिक विकास साधावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रेशीमबाग ः आदिवासी विकास विभागातर्फे समाजातील 29 जणांना सेवक, नऊ सेवा संस्था तसेच मिशन शौर्य-2 अंतर्गत माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. अशोक उईके, डॉ. परिणय फुके, महापौर जिचकार व इतर.


शेतीपूरक लघुउद्योगांद्वारे आर्थिक विकास साधावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ः आदिवासी समाजाचा गौरव सोहळा

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 9 : शेतकऱ्यांसाठी बांबू, मशरूम, मध संकलन तसेच जैव इंधनासाठी अखाद्य तेलबियांचे उत्पादन घेणे यांसारखे शेतीपूरक लघुउद्योग यापुढील काळात अत्यंत किफायतशीर ठरणार आहेत. आदिवासी बांधवांनी स्वयंरोजगार व कौशल्य विकासाची कास धरून शेतीपूरक लघुउद्योगांद्वारे आपला आर्थिक विकास साधावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राज्यस्तरीय गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्य मायाताई इवनाते, प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी 29 आदिवासी सेवक व 9 आदिवासी सेवा संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मिशन शौर्य-2 अंतर्गत माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच शासकीय, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा, तसेच इतर शाळांतील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या 154 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.
डॉ. अशोक उईके म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सुधारणेसाठी अनेक अभिनव योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. आदिवासी विकासाकरिता विविध विभागांनाही भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येतो. याअंतर्गत सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.
डॉ. परिणय फुके यांनी आदिवासींमुळेच वनसंपदा टिकून असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांना आवश्‍यक सेवासुविधांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बेंचमार्क सर्व्हे करण्यात येणार आहे. यामुळे विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्‍य होणार आहेत.

loading image