सामुदायिक प्रार्थनेतून सक्षम संस्कार : प्रा. कंटाळे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थना ही गोड प्रणाली तयार केली आहे. सक्षम संस्कारासाठी बालकांना लहानपणापासूनच सामुदायिक प्रार्थनेची आवड तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. ताराचंद कंटाळे यांनी केले. 

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थना ही गोड प्रणाली तयार केली आहे. सक्षम संस्कारासाठी बालकांना लहानपणापासूनच सामुदायिक प्रार्थनेची आवड तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. ताराचंद कंटाळे यांनी केले. 
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात सामुदायिक प्रार्थनेवर ते बोलत होते. कंटाळे म्हणाले की, संस्काराचे धडे प्रार्थनेतून मिळतात आणि या प्रार्थनेतून आलेली ऊर्जा आयुष्यभर विधायक कार्यासाठी उपयोगी येते. आजच्या काळात संस्काराची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. विचार पक्‍के झाल्याशिवाय प्रगती होत नाही व संस्काराशिवाय नम्रता येत नाही. कारण म्हातारपणी अनेक तरुण आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवितात. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा झेंडा युवकांच्या हाती देण्यापेक्षा सामुदायिक प्रार्थनेचा झेंडा त्यांच्या हातात दिला तर म्हातारपणी आईवडिलांच्या आयुष्यात पश्‍चातापाची वेळ येणार नाही. सामुदायिक प्रार्थना अहंकार नष्ट करून अंत:करणाची शुद्धी करते. शांती व सुख प्राप्तीसाठी सामुदायिक प्रार्थनेची आवश्‍यकता आहे. त्यामुळे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात सामुदायिक प्रार्थना झालीच पाहिजे, हा विचार जोपासला पाहिजे, असे ते म्हणाले. 
आजचे कार्यक्रम 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या, बुधवारी सकाळी 9 वाजता श्रीगुरुदेव आयुर्वेद रसशाळेचा अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. सकाळी 5.30 वाजता सामुदायिक ध्यान, त्यानंतर आचार्य हरिभाऊ वेरूळकर चिंतन व्यक्त करतील. सकाळी 7 ते 8 दरम्यान योगासन व प्राणायाम, त्यानंतर ग्रामगीता प्रवचन खुशाल ठाकरे करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश वाघ भूषवतील. खासदार डॉ. विकास महात्मे उद्‌घाटन करतील. सामुदायिक प्रार्थना सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल. रात्री राळेगाव येथील भक्तगण खंजिरी भजन सादर करतील. रात्री 8 नंतर राहुल रामटेके वाद्य तरंगाचा कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर बालकीर्तनकार साक्षी अतकरे व गुणवंत कुत्तरमारे यांचे कीर्तन होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efficient rites from community prayer: Pro. Kantale