

Eknath Shinde
sakal
परभणी : ‘‘संपूर्ण मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांवर दुष्काळाचे गंभीर सावट असून, शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही’’, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.