
चामोर्शी (जि. गडचिरोली) : शहरात सततच्या वाहतूकोंडीमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असताना रविवार (ता. ८) सकाळी ११ वाजता येथील आष्टी काॅर्नर येथे एसबीआय बँकेजवळ आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने एका वृद्धाला धडक देत चिरडले. यात त्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. मृत वृद्धाचे नाव मलेश भिमन्ना कनकुटलावार (वय ६५) रा. हनुमान नगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, असे आहे.