अमरावती: नऊ बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगूल वाजला । Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

अमरावती: नऊ बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगूल वाजला

अमरावती : कोरोना संक्रमणामुळे मुदतवाढ देण्यात आलेल्या जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगूल फुंकल्या गेला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा उपनिबंधकांना बाजार समितीच्या निवडणुकांची तयारी करण्यास बजावले आहे. यामध्ये दोन्ही टप्प्यातील बाजार समित्यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात बारा बाजार समित्या असून त्यापैकी नऊ बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यांना कोरोना संक्रमणामुळे एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती. शासनाला आता मुदतवाढ देणे शक्य नसल्याने या बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत.

२३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नऊपैकी नांदगाव खंडेश्वर व धामणगावरेल्वे या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये दर्यापूर, चांदूररेल्वे, अचलपूर व अंजनगावसुर्जी या चार बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून ऑक्टोबरमध्ये अमरावती, चांदूरबाजार व तिवसा या बाजर समितीची मुदत संपत आहे. या नऊही बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल फुंकल्या गेला आहे.

बाजार समित्यांना २३ ऑक्टोबर अंतिम मुदत

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सर्व बाजार समित्यांना 23 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत ठरवून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ करण्यास सांगितले आहे. तीन महिन्यांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागणार असल्याने नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईस्तोवर तीन महिने मुदतवाढ दिली आहे. 23 ऑक्टोबरपासून तीन महिने मुदतवाढीचा काळ राहणार आहे. यादरम्यान संचालक मंडळास कोणतेही धोरणात्मक निर्णय करता येणार नाहीत.

टॅग्स :Amravatividarbha