esakal | पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी नव्याने कार्यक्रम, ४६१ ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजणार बिगूल
sakal

बोलून बातमी शोधा

election program announced for 461 grampanchayat in yavatmal

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 461 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते. परंतु, कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्याने छाननीच्या टप्प्यावर निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी नव्याने कार्यक्रम, ४६१ ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजणार बिगूल

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीचा पूर्वीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यामुळे छाननीनंतर स्थगित झालेल्या 461 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. 

हेही वाचा - ग्राहकांनो, तुमच्या घरी येणारे 'आरओ'चे पाणी कायमचे बंद होण्याची शक्यता,...

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 461 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते. परंतु, कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्याने छाननीच्या टप्प्यावर निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्यावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून यादी तयार करण्यात आली होती. यानंतर एक जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्यावत मतदारयादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढवता यावी तसेच मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकीसाठी मतदार यादी, निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. 

हेही वाचा - आमसभा सुरू होताच झाली स्थगित, आचारसंहितेमुळे गाजणाऱ्या मुद्यांवर फेरले पाणी

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच क्षेत्र सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कार्यालयातही आता कोरोना व्यक्तिरीक्त कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील अर्धवट असलेला प्रभागरचना व आरक्षण पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक विभागाला आले होते. त्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक विभागाला "इव्हीएम' मशीनची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चार दिवस ही तपासणी करण्यात आली. परिणामी येत्या डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -

एप्रिल ते जूनमधील ग्रामपंचायती -
कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगितीला प्रदीर्घ काळ झाला आहे. त्यामुळे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 461 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. मतदारयादी कार्यक्रम जाहीर होऊन त्यावर आक्षेप मागितली जाईल. त्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
 

loading image
go to top