
अमरावती - खुल्या बाजारात सातत्याने कापूस व सोयाबीनचे दर पडत आहेत. निवडणुकीत भाजपने सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचे दिलेले आश्वासन व दोन्ही पिकांच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढविण्याची घोषणा हवेत विरली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राज्य सरकार आपल्याच घोषणा व प्रस्तावावर निर्णय घेईल का व दोन्ही पिकांना सोनेरी झळाळी येईल का? या प्रश्नाच्या उत्तराची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. किमान सत्तेतील प्रमुख भाजप आपल्या घोषणांना जागेल का? याचेही उत्तर अधिवेशनातून मिळणार आहे.