Election Results : अकोल्यात भाजपने सलग चौथ्यांदा राखला गड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग चौथ्यांना लोकसभेच्या तिकटापासून वंचित रहावे लागले. कॉंग्रेसला यावेळी वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजनाचा मोठा फटका बसला असून, हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे खासदार धोत्रे यांनी आपलाच विक्रम मोडीत काढून तब्बल साडेपाच लाख मत मिळविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results : sanjay dhotre wins akola battle