गोंदिया : तालुक्याच्या माकडी येथील शेतशिवारात विद्युत तारेच्या स्पर्शाने निमवयस्क सारस पक्ष्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २६) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली..प्रेमाचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ सारस पक्ष्याच्या अधिवासासाठी गोंदिया जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. विशेषतः गोंदिया वनपरिक्षेत्रात सारस पक्ष्यांचे वास्तव्य अधिक आहे. त्यात मागील वर्षी गोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव परिसरात सारस पक्ष्याचे एक जोडपे व त्यांची अंडी आढळून आली होती. .यावर गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालय व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) तर्फे त्या पक्ष्यांची मॉनिटरिंग करून विशेष लक्ष देण्यात आले. दरम्यान, वनविभागाकडून बीएनएचएसच्या मदतीने सारस जोडप्यातील मादा सारसला जीपीएस, जीएसएम टाॅन्समीटर व पायात सांकेतिक रिंग बसवून त्यांच्या पिल्लांच्या पायातही रिंग लावण्यात आले होते..मात्र, वनविभागाच्या या सर्व मेहनतीवर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पाणी फेरले आहे. महावितरणतर्फे विद्युत तारांना प्लास्टिक आवरण बसविण्यात आले नसल्याने रिंगींग केलेल्या सारसपैकीच एका सारसाचा बुधवारी माकडी येथील गणपत तुरकर यांच्या शेतावरून जात असलेल्या ११ केव्हीच्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला..Wardha Crime : आपसी वादातील मारहाणीत एकाचा मृत्यू .घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक अविनाश मेश्राम, गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कुडवा येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनानंतर मृत सारसावर अंत्यसंस्कार करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.