जामली - चिखलदरा तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींवर वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकित झाले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच वीज कपातीची टांगती तलवार ग्रामपंचायतींवर आली आहे. थकीत बिल भरा, अन्यथा पाणीपुरवठ्याची वीज कापण्यात येईल, अशी तंबी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत.