Shivsena News: CM शिंदेंनी काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलेल्या पहिल्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena News, CM Eknath Shinde News

Shivsena News: CM शिंदेंनी काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलेल्या पहिल्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक बाहेर पडले. त्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले. दोन चिन्हं मिळाली. नाव बदलली. त्यानंतर दोन्ही गटाकडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वीच भंडाऱ्यामद्धे शिंदे गटाच्या पहिल्याच कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याच कार्यालयावर अतिक्रमनाची कारवाई करण्यात आली आहे. (Shivsena News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. भोंडेकर यांच्या कार्यालयाच्या समोर असणारे शेड अतिक्रमणात होते. भंडारा नगरपालिकेने काल शहरातील अतिक्रमण हाटवण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे, भंडारा शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हाटवत असतानाच आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयाचेही अतिक्रमित भाग काढण्यात आला आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis : "या मुख्यमंत्र्यांना अन् उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिम्मत नाही"

भंडारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर भंडाऱ्याचे आमदार शिंदे गटात सामील झाले. राज्यात शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 12 नोव्हेंबरला ते भंडाऱ्यात जाऊन त्यांनी आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विदर्भातील शिंदे गटाचे हे पहिले कार्यालय आहे.

हेही वाचा: Maharashtra Winter Assembly : 'गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है'च्या घोषणा; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर