esakal | यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

multipurpose ventilator

यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : कोरोना संकट काळात व्हेंटीलेटर हा शब्द दररोज ऐकायला मिळतो. त्याचा वापरही वाढत चालला आहे. व्हेंटीलेटरद्वारे रुग्णाला कृत्रिम श्‍वास दिला जातो. ही जीवनरक्षक प्रणाली अतिशय महागडी असून, ग्रामीण व दुर्गम भागात वापरण्यास अनुकूल नाही. अनेकदा ग्रामीण भागात तातडीने कृत्रिम श्‍वास देणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून यवतमाळातील अभियंत्याने बहुपयोगी कमी किमतीचे व्हेंटीलेटर तयार केले आहे. त्याला भारत सरकारच्या नोडल एजन्सीची मान्यतादेखील मिळाली आहे.

आकाश सूर्यकांत गडमवार असे युवा अभियंत्याचे नाव असून, त्याने मेकॅनिकल शाखेत एमटेक केले आहे. आकाश 2019 पासून संशोधन करीत होता. आकाशला सागर गड्डमवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने प्रायोगिक तत्त्वावर दोन व्हेंटीलेटर तयार केले. पीजीआयएमईआर चंदीगड या संस्थेच्या बधिरीकरण विभागातील डॉ. राजीव चव्हाण यांनी आकाशच्या संशोधनाची दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण व्हेंटीलेटर तयार केले.

गायरो ड्राइईव्ह मशनरी प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन सुरू झाले. इशान धर व आकाश या दोघांनी व्हेंटीलेटर तययार करून त्याला आयएसओची मान्यता मिळविली. इतकेच नव्हे तर त्याचे पेटंट घेतले आहो. त्यावर चार संशोधन पेपर प्रसिद्घ केले आहे. आता या व्हेंटीलेटरला बांगलादेश, युगांडा, टांझानिया या देशात मागणी होत आहे भारत सरकारच्या जेम पोर्टलवरही त्याला मान्यता मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि टॅलेंट असल्याचे आकाशने दाखवून दिले आहे. या संशोधनामुळे यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वजन केवळ सहा किलो

सहा किलो वजन आणि लिथियम बॅटरीवर चालणारा व्हेंटीलेटर आहो. ग्रामीण भागातील लोकांची गरज लक्षात घेऊन व्हेंटीलेटर तयार केले आहो. सायकल, दुचाकी, किंवा कुठल्याही चारचाकी वाहनात त्याला सहज वापरता येते. घटनास्स्थळावरून व्हेंटीलेटर लावून रुग्णाला रुग्णालयात आणता येते. आणीबाणीच्या प्रसंगी हवेतील ऑक्सीजनवरही हा व्हेंटीलेटर रुग्णाला कृत्रिम श्‍वास देवू शकतो. याला कंट्रोल पॅनल बसविले असून, गरजेनुससार श्‍वास नियंत्रित करता येतो.

संपादन - अथर्व महांकाळ