Amravati News : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूमागे अद्याप गूढ;अमरावती येथील घटना
Police Investigation : अमरावतीतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. पोलिस चौकशी सुरू असून, युवकाची कसून चौकशी व शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
अमरावती : शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवारी (ता. चार) उघडकीस आली.