दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

नागपूर ः विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाल, इतवारी, सीताबर्डी, सक्करदरा, सदर, धरमपेठ आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली आहे. वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा काळ दसऱ्यापासून सुरू होतो. वर्षभर न होणारी खरेदी ग्राहक दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून करतात. त्यामध्ये सर्वाधिक मागणी सोने-चांदीला असली तरी त्याखेरीज वाहन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांची खरेदी, नवीन फ्लॅट बुकिंग, कपडेसुद्धा केले जाते. मंदीमुळे वाहन आणि रिअल इस्टेट क्षेत्र प्रभावित झाले असताना यंदा फक्त सोन्याला झळाळी आली आहे.

रुपयाच्या दरात सातत्याने होणारी घसरण, मंदी सहन करणारे रिअल इस्टेट व अस्थिर शेअर बाजार यामुळे तेथील गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. यामुळे मागील सहा महिन्यांत सोन्याचे दरात चढ उतार झालेली आहे. यापुढील काळातही सोन्याचे दर वाढते राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच अनेकांनी दसऱ्यांचा मुहूर्त साधून सोन्याची खरेदी केली.
सराफा व्यावसायिकांनुसार, वर्षातील 30 ते 35 टक्के सोने खरेदी ही दसरा, त्यानंतर दिवाळी व पुढील लग्नसराईच्या काळात होत असते. त्यात यंदा गुंतवणुकीचे अन्य पर्याय कमकुवत झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांखेरीज मोठ्या गुंतवणूकदारांनीही सोने खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने 40 हजार रुपये प्रतितोळ्यावर गेले होते. त्यात घसरण होऊन प्रतितोळा सोने 38 हजार 200 रुपये झाली आहे. त्यामुळे सोन्याला चांगली मागणी आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा दर 38,200 रुपये प्रतितोळा होता. त्यामुळे दसऱ्याला सोन्याची चांगली खरेदी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे वाहन बाजारात मात्र फार उत्साह नव्हता. इंधनाचे वाढते दर आणि वाढेला विमा यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली. दसऱ्यापूर्वीच नवरात्रादरम्यान सर्वच ऑनलाइन कंपन्यांनी भरमसाठ सवलतींचे सेल जाहीर केले होते. त्याचा मोठा परिणाम कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांच्या खरेदीवर झाला. त्यामुळे या बाजारावर परिणाम झाला आहे. खरेदी तुलनेने खूप कमी झाली.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांनी सोने खरेदीसाठी झुंबड केली होती. अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद यंदा मिळतो आहे. मागील दसऱ्याच्या तुलनेत यंदा आठ हजार रुपयांची वाढ प्रतितोळा झालेली आहे. गतवर्षी 30 हजार रुपये तोळा सोने होते. पुढील वर्षीही दसऱ्याला अशीच वाढ अपेक्षित आहे. दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा कायम असल्याने ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होत आहे.
- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the eve of the tenth, markets swelled