चौराईतून पाणी मिळाल्यानंतरही दोन दिवसाआड पुरवठ्याचे संकट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता नसल्याने शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे. मध्यप्रदेशात पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या चौराई धरणात पाणी अडविल्याने शहरावर जलसंकट सुरू आहे. मात्र, आता चौराई धरण 91.65 टक्के भरले.

नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता नसल्याने शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे. मध्यप्रदेशात पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या चौराई धरणात पाणी अडविल्याने शहरावर जलसंकट सुरू आहे. मात्र, आता चौराई धरण 91.65 टक्के भरले. चौराई धरणाची मर्यादा 90 टक्के असल्याने 15 व 16 ऑगस्ट, दोन दिवस मध्यप्रदेश जलसंपदा विभागाने चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडून अधिकचे 1.65 टक्के पाणी सोडले. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी केवळ 2.11 टक्के पाणीसाठा असलेले तोतलाडोह जलाशय 4.48 टक्के भरले. या दोन दिवसांत चौराई धरणातून 36 एमएम क्‍युब पाणी सोडण्यात आले. चौराई धरणापासून तोतलाडोहचे अंतर 110 किमी असून, काही पाणी जमिनीत मुरले. असे असले तरी केवळ 20 एमएम क्‍युब पाणीसाठा असलेल्या तोतलाडोहमध्ये आज मृतसाठा भरून निघाल्यानंतरही 56 एमएम क्‍युब पाणीसाठा जमा झाला. आणखी काही दिवस यात पाण्याची भर पडणार आहे. मृतसाठा भरून निघाला असून, त्यापेक्षा अधिक पाणी जमा झाल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी 'सकाळ'सोबत बोलताना सांगितले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडत असल्याने पुढील दीड महिन्यातही चौराईतून तोतलाडोह जलाशयात पाणी येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, मनपाला डिसेंबर 2019 नंतरचे पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पुढील जून-जुलैपर्यंतच्या नियोजनासाठी पाण्याची काटकसर सुरूच राहणार आहे. त्यामुळे दररोजच्या कपातीतून नागपूरकरांना दिलासा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांत प्रतिदिवशी 18 एमएम क्‍युब पाणी तोतलाडोह जलाशयात आले. मात्र शहराताला प्रतिदिन 10-12 एमएम क्‍युब पाण्याची गरज असल्याने ते खर्च होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after receiving water from the pasture Two days of supply crisis