
नागपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश झाला.