esakal | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपारच्या नोटीसने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपारच्या नोटीसने खळबळ

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपारच्या नोटीसने खळबळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिग्रस : सर्वत्र सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता दिग्रस पोलिसांनी शहरातील २० युवकांना तीन दिवसाकरीता तडीपारीची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीस मुळे संपूर्ण दिग्रस शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील २० युवक शासनाचा आदेश झुगारून गणेशोत्सवामध्ये शांतता भंग करू शकतात. असा ठपका पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आला असून गणेश मंडळाचे सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा या २० युवकांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा

गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस म्हणजेच ता.१८, ता.१९ व गणेश विसर्जनाचा दिवस ता.२० हे तीन दिवस या २० युवकांना दिग्रस तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून युवकांना तडीपार करण्याचा आदेश काढल्याची माहिती दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी 'दै. सकाळ'शी बोलताना दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २० युवकांना नोटीस दिल्याने संपूर्ण दिग्रसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

loading image
go to top