
अंबाडा - शेतकऱ्यांचे ‘पांढरं सोनं’ असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. रुई आणि सरकीचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माघारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.