बसमधील गांजा तस्करीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पांढरकवडा (जि. यवतमाळ)  : आदिलाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधील गांजा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पिंपळखुटी येथील तपासणी नाक्‍यावर शनिवारी (ता. पाच) करण्यात आली.

पांढरकवडा (जि. यवतमाळ)  : आदिलाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधील गांजा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पिंपळखुटी येथील तपासणी नाक्‍यावर शनिवारी (ता. पाच) करण्यात आली.
देवदास राठोड (वय 25, रा. बाळतांडा, जि. बिदर), श्रीकांत पवार (21, रा. नामूर, जि. संघारेड्डी), राउनम्मा शामलू पारशामलू (35, रा. मंडपेल्ल टेकमल, जि. राजमंड्री), अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळखुटी येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्‍याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन केले आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये असलेल्या पिंपळखुटी येथील तपासणी नाक्‍यावरून अमली पदार्थ, गुटखा, गांजा, धान्य, पैशाच्या तस्करीला विशेष वाव मिळत आहे. शनिवारी दुपारी वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना आदिलाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधील तिघांच्या हालचालीवर संशय आला. त्यांची झडती घेतली असता, तीन लाख रुपये किमतीचा 30 किलो गांजा आढळून आला.
आठवडाभरात चौथी कारवाई
आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून गुटखा, अवैध दारू, पैसे तस्करी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या कालावधीत पिंपळखुटी येथे तपासणी नाका स्थापन करण्यात आला. एकाच आठवड्यात झालेल्या चार कारवाईत जवळपास दहा लाख रुपयांची रोकड व शनिवारी गांजा जप्त करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expose Ganja smuggling going on the bus