Amravati Police : गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचने अमरावतीत बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या तरुणाला अटक केली. दोन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अमरावती : लोकांना बनावट आधारकार्ड तयार करून देणाऱ्या युवकास गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी अमरावती शहरातून एका युवकास सोमवारी (ता. १९) अटक केली आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून गुजरात अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलिस शहरात दाखल झाले होते.