प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव रचून पोलिस भरतीसाठी जोडले दुसऱ्याचेच प्रमाणपत्र; उमेदवार...

police
police

अकोला : पोलिस भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवाराने प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव करून दुसऱ्याच्याच नावाचे प्रमाणपत्र जोडले. निवड झाल्यानंतर त्याची ही बनवाबनवी पोलिसांच्या तपासात उघड झाली. त्यामुळे बीडच्या या उमेदवाराविरुद्ध शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी उमेदवार युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

police
विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून होणार सुरू HSC Result 2023

पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक कैलास चवरे यांच्या तक्रारीनुसार गणेश दिलीप कदम (रा. आहेर वडगाव, ता.जि. बीड) याने पोलिस शिपाई भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त आरक्षणाअंतर्गत अर्ज केला होता.

पोलिस मुख्यालय, अकोला येथे कागदपत्र पडताळणीमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) जिल्हा बीड यांच्या नावाने निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रत कागदपत्रांसोबत दाखल करून मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिल्यानंतर हा उमेदवार पोलिस भरती प्रक्रियेमध्ये पात्र ठरला.

police
Narendra Modi : उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान; थोरातांचा हल्लाबोल

उमेदवाराची ‘ईडब्लूएस’ या संवर्गातून प्रकल्पग्रस्तामध्ये तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झाली होती. उमेदवार गणेश कदम याने खोटे व बनावट प्रमाणपत्र दाखल करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याने, त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com