
कोरपना : कोरपना-वणी राज्य महामार्गावरील तांबाडी फाट्याजवळील एका धाब्यावर स्वतःला उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी म्हणवून खंडणीची मागणी करणाऱ्या आणि एका स्कार्पिओ गाडीतून १६ हजार रुपये चोरणाऱ्या दोन व्यक्तींवर कोरपना पोलिसांनी बुधवारी (ता. २३) गुन्हा दाखल करून अटक केली आहे.