Wardha Crime : काकू, चुलतभावाची हत्या करून आरोपीनी संपवले जीवन; शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड वर्धा जिल्ह्यातील निमसडा हादरले
Crime News : हिंगणघाट तालुक्यातील निमसडा गावात शेतीच्या वादातून पुतण्याने काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने खून केला. खून केल्यानंतर आरोपीने विष प्राशन करून जीवन संपवले . गावात खळबळ उडाली आहे.
अल्लीपूर (जि. वर्धा) : शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात पुतण्याने काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या हत्येनंतर मारेकऱ्याने विष प्राशन केले. त्याचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.