कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरले संपूर्ण कुटूंब

The family is fighting with corona
The family is fighting with corona

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) :  कोरोनाच्या संकटाने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असल्याने यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. यासाठी ते रात्रंदिवस एक करताहेत. अशा संकटसमयी एक परिवार कोरोना वॉरियर्स ठरला आहे. गडचिरोलीतील सिरोंचा, नागपूर, पिंपरी चिंचवडपासून तर ठाण्यापर्यत या परिवारातील सदस्य कोरोनाच्या संकटकाळात आपआपल्या सेवेत मग्न आहेत.

गोंडपिपरी येथील डॉ. अनिल ताडशेट्टीवार हे करंजी व लगतच्या ग्रामीण परिसरात खासगी वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांची मोठी मुलगी आश्‍विनी कोम्पेलवार या ठाणे येथील कोरोना रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे येथे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर आहे. अशावेळी कोरोनाग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी त्या सातत्याने तत्पर आहेत. सकाळी रुग्णालयात पोहोचल्यानंतर पीपीई किट परिधान केली की लगेच आरोग्यसेवेला लागायचे. न थकता न डगमगता त्या तिथे आपले कार्य पार पाडत आहेत. एकीकडे कोरोनाची भिती आहे. पण दुसरीकडे आलेले हे संकट टळणार हा आशावादही आहे. शासनाने दिलेल्या निवास केंद्रात राहायचे अन्‌ आपले कर्तव्य पार पाडायचे. अनेकदा इमरजन्सीच्या वेळेत आरोग्यसेवेसाठी तप्तर असायचे हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्याचे पती डॉ. योगेश कोम्पेलवार हे उल्हासनगर येथे शासकीय वैद्यकीय सेवेत आहेत. दुसरीकडे डॉ. ताडशेट्टीवार यांची लहान मुलगी अनुपमा पिंजरकर या गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोचा येथील रुग्णालयात औषधी निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गडचिरोलीत कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी कोरोनाच्या संकटकाळात येथील प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. अनुपमाचे पती रोहित पिंजरकर हे पिंपरीचिंचवड येथे पोलिस आहेत. अनुपमा सिंरोचात आरोग्यसेवेत असताना रोहीत सामाजिक सुरक्षेचे काम करीत आहेत. डॉ. ताडशेटटीवार यांचे जावई आशीष बार्लावार हे नागपुरात असतात. ते सीताबर्डी पोलिस ठाण्यात पोलिस आहेत. मुंबई, पुण्यानंतर नागपुरात कोरोनाचा वाढता आकडा चिंतनीय आहे. अशावेळी नागरिकांनी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिस सतर्क आहेत.
कोरोनाच्या महासंकटाने माणसांना एकमेकांपासून दूर केलें. पण कोरोनावर मात करण्याचा ध्यास घेत आपली आरोग्य यंत्रणा,पोलिस विभाग जिवाचे रान करीत आहे. आपल्या जिवाची बाजी लावत ते कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत आहेत. डॉ. ताडशेट्टीवार यांच्या मुली व जावई कोरोनाच्या संकटकाळात अतिशय विदारक स्थितीत न डगमगता आपले कर्तव्य बजावत कोराना वॉरियर्स ठरले आहेत.

चिंता अन्‌ अभिमानही

आपल्या मुली, जावई घरापासून कोसो दूर कोरोनाच्या काळात सेवा बजावत आहेत. कोरोनाबाधितांना आरोग्यसेवा पुरवित आहेत. एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात त्यांची चिंता आईवडिल व परिवारातील सदस्यांना आहे. भ्रमणध्वनीवरून रोजच या सर्वांशी बोलून कुटुंबीय त्यांच्याशी बोलत आहेत. कोरोनात सेवा देणाऱ्यांची एकीकडे काळजी आहे तर दुसरीकडे त्यांच्याबद्दलचा अभिमानही आईवडिलांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com