शेतकऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : पळसगाव (बाई) येथील महिला शेतकरी लीला विश्वनाथ भट यांच्या शेतातून गेलेल्या टॉवर लाइनखालील सागाची झाडे बळजबरीने पोलिस बंदोबस्तात तहसील विभागाच्या मदतीने तोडण्यात आली. त्यामुळे शेतकरी महिलेचा मुलगा राजू विश्वनाथ भट (वय 48) याने विष प्राशन केले. बुधवारी (ता 5) सकाळी 11 वाजता ही घटना घडली. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पळसगाव शिवारात शेतकरी लीलाबाई भट आणि सूर्यभान भट यांच्या शेतातून पॉवरग्रिड कॉर्पोरेशन कंपनीची वीजवाहिनीची टॉवर लाइन गेली आहे. या टॉवरखाली येणाऱ्या सागाच्या झाडांचा योग्य मोबदला देऊन कंपनीतर्फे झाडे तोडण्याचा प्रस्ताव या शेतकऱ्यांना दिला होता. मात्र, हा मोबदला अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहारसुद्धा केला. परंतु या कंपनीने तहसीलदार आणि पोलिस विभागाच्या मदतीने मंगळवारी (ता. 4) शेतकऱ्यांना नोटीस दिल्या. बुधवारी (ता. 5) सकाळी 11 वाजता सर्व फौजफाट्यासह अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात दाखल झाले. कटरने झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी राजूने झाडे तोडण्यास विरोध केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचे ऐकून घेतले नाही. राजूने संतापाच्या भरात विष घेतले. त्याला तत्काळ सिंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शेतकऱ्याची आत्महत्या
समुद्रपूर : तालुक्‍यातील मेनखात येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी बुधवारी (ता. 5) गळफास लावून आत्महत्या केली. मोहनकुमार कछवा (45, रा. मेनखात, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कछवा यांच्याकडे दहा एकर शेती आहे. ते गावचे पोलिस पाटीलही होते. सततच्या नापिकीने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यांच्यावर सावकारी व खासगी कर्ज होते. त्यांची पत्नी व मुलगा दोन दिवसांपूर्वी अचलपूर येथे माहेरी गेली. दरम्यान, त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer commited suicide