'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

बुलढाणा: 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. राजू ज्ञानदेव तलवारे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली.

दरम्यान, येवला येथे शनिवारी (ता. 12) संध्याकाळी एका युवा शेतकऱयाने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक असून सर्वत्र प्रचारादरम्यान आश्वासनांना पाऊस पडत आहे, असे असातनाही शेतकऱयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer committed suicide wearing bjp t shirt in buldhana