भंडारा - भंडारा व परिसरात सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. यात सिल्ली शिवारात वीज कोसळून शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव शिवा दुधराम बागडे (वय ३७) असे आहे..भंडारा व परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आकाशात अचानक ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. सुमारे १५ ते २० मिनीटांपर्यंत रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला..या दरम्यान, तालुक्यातील सिल्ली शिवारात शिवा बागडे हे हार्वेस्टर मशीनने उन्हाळी धानाची कापणी सुरू होती. त्यावेळी शिवा बागडे हा शेतात उभा होता. दरम्यान, अचानक सुरू झालेल्या पावसात शेतात वीज कोसळली. त्यामुळे शिवा बेशुद्ध झाला. जवळ असलेल्या लोकांनी तपासणी केली असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता..विशेष म्हणजे त्याची पत्नी बुधवारी प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल होणार असल्याने त्याने आजच धानकापणीचे काम पूर्ण करण्याचे ठरवले होते. या घटनेत इतर कोणीही जखमी झाले नाहीत. याबाबत आपत्ती व्यवस्थापनच्या नियंत्रण कक्षात नोंद करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.