Lightning Strike: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पिंपळखुटा लहान शेतशिवारातील घटना
Weather Impacts: मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा (लहान) शेतशिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मधुकर पैठणकर हे शेतात काम करत असताना विजेच्या कडकडाटात त्यांचा मृत्यू झाला.
शिरखेड : मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा (लहान) शेतशिवारात वीज पडून शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जुलै रोजी घडली. मधुकर मुकुटराव पैठणकर (वय ५२, रा. निंभी), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.