Farmer ID : तांत्रिक बाबीत अडकले शेतकऱ्यांचे आयडी; सबसीडीपासून वंचित राहण्याची शक्यता
Maharashtra Farmers : ऑनलाइन नोंदणी करून एक महिना उलटून गेला, तरी पथ्रोट येथील रमेश सहारे यांना फार्मर आयडी मिळालेला नाही. प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असून सबसिडीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पथ्रोट : ऑनलाइन पद्धतीने फॉर्मर आयडीकरिता नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आयडी क्रमांक उपलब्ध करण्यात येत आहे. परंतु येथील शेतकरी रमेश राजाराम सहारे यांना मागील एक महिन्यापासून मान्यता दिल्या गेलेली नाही.