Amravati News : बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने; धामणगाव येथील शेतकऱ्याने जीवन संपवले
Kharif Season Stress : धामणगावरेल्वे तालुक्यातील ढाकूलगाव येथील ७० वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक अडचणींमुळे झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे-खतांची सोय न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
धामणगावरेल्वे : येत्या खरीप हंगामात बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने तालुक्यातील ढाकूलगाव येथील एका सत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.